दिल्ली रणजी संघाच्या कर्णधारपदी ‘नितीश राणा’

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट खेळाडू ‘गौतम गंभीर’ याने दिल्ली रणजी संघाचे कर्णधारपद सोडले आहे. त्यामुळे आता युवा फलंदाज ‘नितीश राणा’ याला रणजी ट्राफी याला रणजी ट्राफी 2018-19 साठी दिल्ली रणजी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघ यांची सोमवारी बैठक झाली. या बेठकीत रणजी ट्राफी 2018-19 साठी  पहिल्या सामन्यासाठी संघाची निवड करण्यात आली आहे. तसेच सर्व खेळाडूंना मंगळवारी प्रशिक्षक ‘मिथुन मन्हास’ यांच्याकडे रिपोर्टिंग करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दिल्लीच्या संघास रणजी ट्राफीतील पहिला सामना एलीट ग्रुप बी मधील हिमाचल प्रदेश यांच्याविरूध्द 12 नोव्हेंबर रोजी खेळयाचा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)