दिल्ली पोलिसांना आणखी फोर्सची गरज – राजनाथ सिंह

file photo

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्ली पोलिसांना आणखी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. यासाठी सरकार 4,000 पेक्षा जास्त जागांसाठी भरतीचा विचार करत आहे.

राजनाथ सिंह म्हणाले, मागील चार वर्ष दिल्ली पोलिसांमध्ये बदल झाला असून ते गंभीर अपराधांना कमी करण्यात यशस्वी झाले आहेत. पोलीस उपायुक्त (दक्षिण-पश्चिम) नवीन कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ते पोलिसांना उद्देशून म्हणाले, जमिन संबंधित वादात पोलिसांनी पडू नये. पोलिसांना जमीन प्रकरण वादात न्यायाधीशांची भूमिका घेण्याची काही गरज नाही. त्यासाठी न्यायालय काम करत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)