दिल्ली पोलीसांने मागितली एक कोटीची लाच

नवी दिल्ली: दिल्ली पोलीसांने 1 कोटीची लाच मागितल्यचे एक प्रकरण उघडकीस आले आहे. ऑन लाईन फसवणुकीच्या प्रकरणी पोलीसांनी पाच जणांना अटक केली होती. या प्रकरणातील प्रदीप नावाचा सहावा आरोपी पश्‍चिम दिल्लीत राहत आहे. दिल्लीच्या तीन पोलीसानी प्रदीपला पकडले आणि चौकीत न आणता एका घरात बंदी करून ठेवले. त्यानंतर या तीनही पोलीसांनी प्रदीपची पत्नी नेहा हिच्याशी संपर्क साधला. आणि प्रदीपला वाचवण्यासाठी दीड कोटी रुपयांची मागणी केली. नेहाने एक कोटी रुपये देण्याची तयारी दाखवली.अखेर एक कोटी रुपयांवर तडजोड झाली. लाचेचा पहिला हप्ता रु. दीड लाख घेऊन नेहा आपल्या तीन साथीदारांसह मौर्य एन्क्‍लेव्ह येथे गेली. तीनही पोलीस तेथे साध्या वेषात आले.

पैसे देण्यापूर्वी नेहाने आपल्या पतीला-प्रदीपला भेटण्याची मागणी केली, प्रदीप त्यांच्याच ताब्यात असल्याची तिला खात्री करून घ्यायची होती. मात्र साध्या वेषातील पोलीसांनी नेहाची मागणी मानली नाही. त्यावरून पोलीस, नेहा आणि तिच्या साथीदारांमध्ये बाचाबाची होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. हाणामारीची खबर मिळताच त्या ठिकाणी पीसीआर (पोलीस कंट्रोल रूम) व्हॅन आली आणि त्या सर्वांना घेऊन पोलीस चौकीत गेली. तेथे हा एक कोटीच्या लाचेचा मामला उघड झाला. पुढील कारवाई चालू आहे.

चार डिसेंबर रोजी पानिपतच्या यमुनानगरमध्ये पोलीसांनी संगनमत करून एका आरोपीला परदेशात पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे. त्यानुसार जामिनावर असलेल्या एका आरोपीला पोलीसांनी पासपोर्ट व्हेरीफिकेशनमध्ये क्‍लीन चीट दिली आणि आरोपी ऑस्ट्रेलियाला पळून गेला. पोलीसांनी फरारी आरोपीऐवजी कोर्टात दुसऱ्याच माणसाला हजर केले. ही गोष्टही उघडकीस आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)