विविध शहरातील इंधनाचे दर

मुंबई : पेट्रोल (89.29), डिझेल (78.26)
चेन्नई : पेट्रोल (85.15), डिझेल (77.94)
कोलकत्ता : पेट्रोल (83.76), डिझेल (75.57)
पुणे : पेट्रोल (89.13), डिझेल (76.91)

नवी दिल्ली – इंधनाचा भडका कायम राहात आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झालेली आहे.

रविवारी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये लिटरमागे अनुक्रमे 28 पैसे आणि 18 पैशांची वाढ झाली आहे.

आज पुन्हा दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचा दर 81.91 रूपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 73.72 रूपये प्रति लिटर इतका झाला आहे.

जागतिक बाजारपेठेतील कच्च्या इंधनांचे वाढलेले दर आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रूपयाच्या मुल्यातील मोठी घसरण या घटकांमुळे पेट्रोल, डिझेल दर वाढत आहेत.

जनसामान्यांना होरपळून काढणाऱ्या इंधन दर भडक्‍यामुळे मोदी सरकार विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य बनले आहे. असे असले तरी इंधनांवरील कर कमी करून ते स्वस्त करण्यासंदर्भात पाऊल उचलण्याची तूूर्त सरकारची तयारी नसल्याचेच संकेत मिळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)