दिल्लीत पेट्रोल-डिझेल दरवाढीचे सत्र कायम, काँग्रेसची उद्या ‘भारत बंद’ची हाक

विविध शहरातील इंधनाचे दर

मुंबई : पेट्रोल (87.89), डिझेल (77.09)
चेन्नई : पेट्रोल (83.66), डिझेल (76.75)
कोलकत्ता : पेट्रोल (83.39), डिझेल (75.46)
पुणे : पेट्रोल (87.75), डिझेल (75.76)

नवी दिल्ली –  इंधनाचा भडका कायम राहात आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झालेली आहे. रविवारी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये लिटरमागे अनुक्रमे 12 पैसे आणि 10 पैशांची वाढ झाली आहे.

मागील दोन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक रूपये प्रति लिटर अशी वाढ झालेली आहे. आज पुन्हा दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचा दर 80.50 प्रति लिटर तर डिझेलचा दर 72.61 रूपये प्रति लिटर इतका झाला आहे.

इंधन दरांनी जनसामान्यांचे कंबरडे मोडल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी कर कमी करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.मात्र, इंधनांवरील कर कमी करण्याचा मोदी सरकारचा तूर्त कुठलाही विचार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

काँग्रेसकडून भारत बंद ची हाक

दरवाढीच्या सत्रामुळे सरकारविरोधात निदर्शने करण्यास सज्ज झालेल्या विरोधकांच्या संकल्पाला आणखीच इंधन मिळत आहे. इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने  सोमवारी (10 सप्टेंबर) भारत बंदची हाक दिली आहे. काँग्रेसच्या भारत बंदमध्ये आरजेडी आणि डीएमके सुध्दा सामील होणार आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)