‘त्या’ अपघातग्रस्त इंडोनेशियन विमानाचा पायलट भारतीय 

आज सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी जाकार्ताहून निघालेले लायन एअरवेजचे विमान ‘टेक ऑफ’ नंतर अवघ्या काही मिनिटांतच समुद्रामध्ये कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात प्रवाश्यांसह विमानावरील सर्व कर्मचाऱ्यांचा दुर्घटनेमध्ये अंत झाला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सदर जेटी ६१० या विमानाचा वैमानिक भारतीय असल्याची माहिती समोर आली आहे. भव्ये सुनेजा नामक ३१ वर्षीय वैमानिक या अपघातग्रस्त विमानावर कॅप्टन म्हणून रुजू होते. सुनेजा हे मूळचे दिल्लीचे असून ते गेल्या सात वर्षांपासून लायन एअरवेज सोबत काम करत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)