नवी दिल्ली – दिल्ली उच्च न्यायालयाने प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा व त्यांचे निकटवर्तीय मनोच अरोरा यांना आज (सोमवारी) नोटीस पाठवली आहे. ही नोटीस अमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) त्या याचिकेवरून पाठवण्यात आली आहे, ज्यात मनिलॉंड्रिंग प्रकरणात रॉबर्ट वढेरा यांना मिळालेला जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका सक्त वसुली विभागाने म्हणजेच ईडीने केली होती. या याचिकेवर सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली.
या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ जुलै रोजी होणार आहे. राॅबर्ट वढेरा यांना 17 जुलैपर्यत ईडीच्या याचिकेवर उत्तर देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले आहे.
Delhi High Court issues notice to Robert Vadra and his close aide Manoj Arora on ED's plea challenging trial court order granting them the anticipatory bail. Next date of hearing is 17th July. (file pic) pic.twitter.com/42EnyyQ2xl
— ANI (@ANI) May 27, 2019
दरम्यान, वढेरा हे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेव्हणे आहेत. दिल्लीच्या ट्रायल कोर्टाने त्यांना 1 एप्रिल रोजी अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. त्यांना देण्यात आलेल्या अटकपूर्व जामिनाचा तपासकामांवर विपरीत परिणाम होत आहे, असे ईडीने न्यायालयात सांगितले होते. तसेच तपास कार्यात वढेरा सहकार्य करत नसल्याचा आरोपही केला होता. वढेरा यांच्या बरोबरच ईडीने त्यांचे निकटवर्ती मनोज अरोरा यांचा जामीन अर्जही रद्द करण्याची मागणी केली आहे.