देशभरातील ऑनलाईन औषधे विक्रीवर दिल्ली हायकोर्टाची बंदी  

नवी दिल्ली – देशभरातील ऑनलाईन औषधे विक्रीवर दिल्ली उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय दिला असून सक्तीने राबविण्याचा आदेश दिला आहे.

डर्मेटोलॉजिस्ट जहीर अहमद यांनी ऑनलाईन औषधे विक्रीविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने म्हंटले कि, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जाऊ शकत नाही आणि यावर त्वरित लगाम घालण्याची आवश्यकता आहे.

नियमांचे उल्लंघन करून दररोज लाखोंच्या संख्येने ऑनलाईन औषधांची विक्री केली जाते. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनविना ऑनलाईन औषधांची विक्री करण्यात येत आहे, असे याचिकाकर्त्याने न्यायालयात सांगितले. यावेळी याचिकाकर्त्याने बेकायदेशीररीत्या ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्या वेबसाईटची नावे न्यायालयात दिली. शिवाय काही वेबसाईट्स बंदी असलेल्या औषधांचीही विक्री करत असल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे. ही याचिका निकाली काढताना दिल्ली उच्च न्यायालयाने देशभरातील ऑनलाईन औषधे विक्रीवर बंदी घातली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)