दिल्ली बनतेय देशातील गुन्ह्यांची राजधानी – आपच्या खासदाराचा राज्यसभेत आरोप

नवी दिल्ली – देशाच्या राजधानीत पोलिसांच्या निष्क्रीयतेमुळे गुन्ह्यांचे प्रमाण खूप वाढले असून दिल्ली आता देशाच्या गुन्ह्यांची राजधानी बनली आहे असा आरोप आम आदमी पक्षाचे खासदार संजयसिंह यांनी आज राज्यसभेत केला. दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती तसेच वाढते गुन्हेगारीचे प्रमाण या विषयी त्यांनी शुन्य प्रहरात विषय उपस्थित करताना सांगितले की गुन्ह्यांचे हे प्रमाण पाहिले तर दिल्ली ही आता कॅपिटल क्राईम बनली आहे. त्यांनी गुन्ह्यांची आकडेवारीही सादर केली.

ते म्हणाले की दिल्लीत पोलिसांना गेल्या एक वर्षात 220 वेळा गोळीबार करावा लागला आहे. बलात्काराचे वर्षभरात 243 गुन्हे नोंदवले गेले आहेत. खुनांच्या गुन्ह्यातही मोठी वाढ झाली आहे. दिल्लीतील पोलिस अत्याचारी झाली आहेत असा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणी गृहमंत्र्यांनी एक तातडीची बैठक आयोजित करून त्या बैठकीला दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनाहीं निमंत्रित करण्यात आले आहे अशी मागणी संजयसिंह यांनी सभागृहात केली.

Leave A Reply

Your email address will not be published.