दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांचे मोदींना निमंत्रण

शाळा, व मोहल्ला क्‍लिनीकला भेट देण्याची केली विनंती

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना दिल्ली सरकारने उभारलेल्या आधुनिक शाळा आणि मोहल्ला क्‍लिनीक प्रकल्पांना भेट देण्याचे निमंत्रण दिले. केजरवाल सरकारच्या या कामाचे देशभर कौतुक होत आहे.

मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार दिल्लीत दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर केजरीवालांनी त्यांची घेतलेली ही पहिलीच भेट आहे. या आधी मोदींनी बोलावलेल्या सर्व पक्षीय अध्यक्षांच्या बैठकीला केजरवाल उपस्थित नव्हते. यावेळी केजरीवालांनी त्यांच्याशी आयुष्यमान भारत योजनेविषयी चर्चा केली. त्यांनी मोदींच्या निदर्शनाला आणून दिले की आयुष्यमान भारत योजने पेक्षा आम आदमी पक्षाच्या सरकारने राबवलेली वेैद्यकीय मदत योजना अत्यंत परिणामकारक आहे.

दिल्ली सरकार राबवत असलेल्या योजनेला जोडूनच आयुष्यमान भारत योजनेचे एकत्रिकरण करता येईल काय हेही आपण तपासून पाहू असेही केजरवालांनी म्हटले आहे. केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योंजनेपेक्षा आमच्या सरकारची योजना दहा पट अधिक चांगली आहे असा दावा केजरीवालांनी या आधी केला होता. मोदी सरकारने देशातील 50 कोटी लोकांसाठी आयुष्यमान भारत योजनासुरू केली होती पण अजून पर्यंत प्रत्यक्षात त्याचा लाभ केवळ 26 लाख लोकांनाच होऊ शकला आहे. दिल्ली सरकारच्या विविध योजनांना केंद्र सरकारची मदत मिळायला हवी अशी मागणीही केजरीवालांनी मोदींकडे केली. पावसाळ्यात युमना नदीचे पाणी साठवण्यासाठीच्या योजनेला केंद्राने मदत द्यावी अशी मागणीही त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)