स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू ‘दाती महाराजां’वर गुन्हा दाखल

नवी दिल्ली – स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू दाती महाराज यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले होते.

सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले की, आतापर्यंतच्या चौकशीच्या आधारे दाती महाराजावर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने ही केस दिल्ली पोलीस क्राइम ब्रॅंच कडून घेऊन सीबीआयकडे सोपविली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान आश्रमातील एका 25 वर्षीय पीडित महिलेने 7 जून रोजी दिल्लीतील फतेहपूर बेरी पोलीस स्टेशनमध्ये दाती महाराज आणि त्याच्या शिष्यांविरूध्दात बलात्कार आणि अनैसर्गिक शारिरिक संबंध प्रस्थापित केल्याची तक्रार दाखल केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)