#CSKvDC : नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाजीचा निर्णय

चेन्नई – आयपीएलच्या बाराव्या मोसमात बाद फेरीत दाखल झालेल्या दोन संघांमध्ये सामना होणार असून यात प्ले ऑफ्समध्ये दाखल झालेला पहिला संघ चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दुसरा संघ दिल्ली कॅपिटल्स यांच्यादरम्यान वर्चस्वाची लढाई असणार आहे.

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना थोड्याच वेळात चेन्नईतील एम. ए. चिदंबरम मैदानावर सुरू होणार असून तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सकडून लागला असून दिल्लीच्या कर्णधाराने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.

दरम्यान,आजच्या सामन्यात जो संघ विजयी होईल तो क्रमवारीत अव्वल स्थान पटकावेल त्यामुळे अखेरच्या साखळी सामन्यापर्यंत पहिल्या दोन संघांमध्ये स्थान कायम राखत अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी विजयी संघाकडे असेल.

चेन्नई सुपर किंग्स संघ –

शेन वॉटसन, फाफ डू प्लेसी, सुरेश रैना, अंबाति रायुडू, एमएस धोनी, केदार जाधव, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, दीपक चहर, हरभजन सिंह, इमरान ताहिर

दिल्ली कॅपिटल्स संघ –

पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, कॉलिन इनग्रॅम, शेरफेन रूदरफोर्ड, क्रिस मॉरिस, अक्षर पटेल, जगदीश सुचित, अमित मिश्रा, ट्रेंट बोल्ट

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)