गॅस चेंबरमध्ये बदलू शकते दिल्ली; 1 ते 10 नोव्हेंबर दिवस धोकादायक

नवी दिल्ली – १ नोव्हेंबरपासून राजधानी दिल्लीतील वातावरण धोकादायक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण बोर्डाने एनवायरमेंट पॉल्यूशन (प्रिवेंशन एंड कंट्रोल) अथॉरिटी फॉर एनसीआरला दि‍वाळीच्या 10 दिवसात दिल्लीमध्ये नियमांचे सख्तीने पालन करण्याचे आदेश दिले आहे.

दरम्यान दिल्ली प्रदूषण नियंत्रण बोर्डने प्रदूषित हवेमुळे धोकादायक वातावरण होण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण बोर्डानुसार, पंजाब आणि हरियाणा भागाकडून येणाऱ्या हवेमध्ये धान जाळल्यामुळे हवेसोबत प्रदूषित हवा येत असते. यामुळे दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण निर्माण होते. प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर वातावरण आणखी बिघडू शकते. या वातावरण बदलामध्ये हवा दिल्लीला गॅस चेंबर बनवू शकते. यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने एनवायरमेंट पॉल्यूशन (प्रिवेंशन एंड कंट्रोल) अथॉरिटी फॉर एनसीआरला दि‍वाळीच्या 10 दिवसांमध्ये दिल्लीमध्ये काही नियमांचे पालन सक्तीने करण्याचे आदेश दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)