#IPL2019 : दिल्लीचा मुंबईवर 37 धावांनी विजय

मुंबई -शिखर धवन, ऋषभ पंत आणि कॉलिन इन्ग्रामने केलेल्या फटकेबाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्याच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा चार गडी आणि 37 धावांनी पराभव करत आगेकूच केली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने निर्धारित 20 षटकांत 213 धावांची मजल मारून मुंबई समोर विजयासाठी 214 धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात उतरलेल्या मुंबईची सुरुवात खराब झाली. सलामीला आलेला कर्णधार रोहित शर्मा 14 धावा करून माघारी परतला. पाठोपाठ सूर्यकुमार यादवला श्रेयस अय्यरने धावबाद करत मुंबईला दुसरा धक्का दिला. त्यानंतर सलामीवीर क्विंटन डी कॉकने युवराजच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, आक्रमक खेळण्याच्या नादात तो 16 चेंडूत 27 धावा करून इशांत शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाला.

त्यामुळे मुंबईची अवस्था 5.5 षटकात 3 बाद 45 अशी झाली. त्यानंतर आलेल्या पोलार्ड आणि युवराजने आक्रमक खेळी करुन चौथ्या विकेटसाठी 5 षटकात 50 धावांची भागीदारी केली पण, पोलार्ड 21 धावा करुन परतला. त्यानंतर युवराजने एका बाजूने फटकेबाजी करत 35 चेंडूत 53 धावांची खेळी करत मुंबईला 170 धावांपर्यंत मजल मारून दिली. मात्र, युवराज परतल्यानंतर इतर फलंदाजांनी केवळ हजेरी लावल्याने मुंबईचा डाव 19.2 षटकांत 176 धावांतच संपुष्टात आला.

यावेळी नाणेफेक जिंकून गोलंदाजी करणाऱ्या मुंबईने दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांना लवकर माघारी पाठवत दिल्लीची 2 बाद 29 धावा अशी अवस्था केली होती. मात्र, त्यानंतर दुसरा सलामीवीर शिखर धवन आणि कॉलिन इन्ग्राम यांनी दिल्लीचा डाव सावरताना 83 धावांची भागीदारी नोंदवली.

दोघेही बाद झाल्यानंतर ऋषभ पंतने सामन्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेत फटकेबाजी करायला सुरुवात केली. पंधराव्या षटकापर्यंत मुंबईच्या गोलंदाजांचे वर्चस्व असणाऱ्या सामन्यात अचानक दिल्लीने पुनरागमन करत मुंबईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. ऋषभने केवळ 18 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण करत दिल्लीला 213 धावांची मजल मारुन दिली. यावेळी ऋषभने 27 चेडूत 7 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने नाबाद 78 धावांची तडाखेबाज खेळी केली तर शिखर धवनने 43 आणि इन्ग्रामने 47 धावांची खेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)