आमचे फोटो डिलीट करा

सारा अली खानने सुशांत सिंह राजपूतच्या बरोबर “केदारनाथ’मधून पदार्पण केले. त्या पहिल्यावहिल्या सिनेमाच्या शुटिंगच्यावेळीच हे दोघे प्रेमात पडले असावेत. त्यामुळेच सिनेमा रिलीज होऊन गेला तरी त्यांचे डेटिंग सुरूच आहे. अजूनही हे दोघे एकमेकांना अधूनमधून भेटतच असतात, असे समजते आहे. एवढेच नव्हे, तर हे दोघे एकमेकांच्या घरांच्या बाहेरही गप्पा मारताना आढळून आले आहेत. नेटिझन्सना जर हे “लव्ह बर्डस्‌’ दिसले तर फोटो काढून गॉसिप फॅक्‍टरी चालवायची संधी कोण सोडणार…!

पण या दोघांचे फोटो काढणाऱ्यांना सुशांत आणि साराने अडवले आहे. कृपया आमचे फोटो काढू नका, अशी विनंतीच या दोघांनी केली आहे. अशाच एका इव्हेंटच्या प्रसंगी सुशांत आणि साराने पापाराझींना “फोटो डिलीट’ करण्याची विनंती केली होती. तेव्हापासून यांच्यामध्ये काही तरी “इंटरेस्टिंग’ होते आहे, याची कुणकुण लागली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“केदारनाथ’च्या शुटिंगच्यावेळीही एकदा साराने डेहराडूनचा दौरा लवकर आटोपला होता आणि ती मुंबईला निघून आली होती. याचे कारण सुशांत सिंह राजपूतच्या वाढदिवसाला तिला उपस्थित राहायचे होते, हे नंतर लक्षात आले. कारण सुशांतच्या घरी रात्री उशिरा ती केक घेऊन गेली होती, त्यानंतर हे दोघे मिळून “डिनर डेट’साठी गेले होते, हे देखील उघड झाले. अर्थात दोघांच्याही निकटच्या सूत्रांनी “असे काही नाही.’चा नारा सुरू ठेवला आहे. हे दोघे अगदी चांगले मित्र आहेत. त्यांच्यात काही नाही, वगैरे वगैरे….सुरू झाले आहे. मात्र, फोटो डिलीट करायला सांगणाऱ्यांमध्ये “काही नाही’ असे मानणे चुकीचेच ठरेल. किमान गॉसिप पकवणे हे ज्यांचे काम आहे, त्यांना तरी हे पटणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)