काँग्रेसने परवानगी न दिल्यानेच अँटी सॅटेलाईट मोहिमेस विलंब : डीआरडीओच्या माजी अध्यक्षांचा दावा

भारतातर्फे आज #MissionShakti मोहिमेअंतर्गत भारतीय संरक्षण संशोधन व विकास विभाग (डीआरडीओ) आणि ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेल्या A-SAT प्रणालीच्या यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. या चाचणीनंतर देशातील राजकीय वातावरण भलतेच तापत असल्याचे चित्र असून आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून या मोहिमेचे श्रेय आपल्या पदरात पडून घेण्यासाठी कसरत सुरु आहे.

दरम्यान, श्रेयवादाची लढाई सुरु असतानाच आता डीआरडीओच्या माजी अध्यक्षानी केलेल्या एका दाव्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. भारतीय संरक्षण संशोधन व विकास विभागागाचे माजी अध्यक्ष वी के सारस्वत यांनी केलेल्या दाव्यानुसार युपीए सरकारच्या काळात अँटी सॅटेलाईट मोहिमेच्या तयारीबाबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व राष्ट्रीय सुरक्षा परिषदेशी संपर्क साधला होता मात्र आम्हाला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने ही मोहीम लांबणीवर पडली. जर २०१२-२०१३ मध्ये आम्हाला याबाबत परवानगी मिळाली असती तर आम्ही ही मोहीम २०१४-२०१५मध्येच फत्ते केली असती. मात्र भाजपच्या काळात जेव्हा डॉ. सतीश रेड्डी आणि एनएसए अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर प्रस्ताव मांडला तेव्हा त्यांनी धाडस दाखवत मोहिमेसाठी परवानगी दिली.”

https://twitter.com/ANI/status/1110862872270262273

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)