अद्रमुक पक्षाचे माजी नेते दिनकरण यांच्यावर आरोप निश्‍चीती

नवी दिल्ली: अद्रमुक पक्षाचे माजी नेते टीटीव्ही दिनकरण यांच्यावर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना निवडणूक चिन्हासाठी लाच देऊ केल्याच्या प्रकरणात दिल्लीतील कोर्टात आज आरोप निश्‍चीत करण्यात आले. विशेष न्यायाधिश अरूण भारद्वाज यांच्या कोर्टात हा खटला सुरू आहे. त्यावेळी त्यांनी या प्रकरणात आपण दोषी नसल्याचे म्हटले आहे. आता या खटल्याची नियमीत सुनावणी 17 डिसेंबर पासून सुरू होणार असून त्यादिवशी पुरावे नोंदवून घेण्याचे काम केले जाणार आहे.

दिनकरण हे तामिळनाडुतील राजकीय नेते असून त्यांनी अम्मल मक्कल मुन्नेत्र कळघम नावाचा एक स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे. त्यांची अद्रमुक पक्षातून अलिकडेच हाकालपट्टी करण्यात आली आहे. या खटल्यात दिनकरण यांचे साथीदार टी. पी. मल्लिकार्जुन आणि बी कुमार हेही आरोपी आहेत. शशिकला यांच्या नेतृत्वाखालील अद्रमुक पक्षाला या पक्षाचे दोन पानांचे निवडणूक चिन्ह मिळावे यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला होता.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)