बॉलीवूडमधील प्रत्येक अभिनेत्री आपल्या फिटनेसबाबत खूपच जागरूक असतात. पण दिशा पाटनी आपल्या फिटनेसबाबत जास्त्च क्रेझी असल्याचे दिसते. रियल नव्हे, तर रील लाईफमध्येही तिने आपले स्टंट दाखविले आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचे सिक्स पॅक ऍब्स स्पष्ट दिसत होते. आता दिशाने आपला एक फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडिओत ती हवेतच किक्स परफॉर्म करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तिचे चाहते अवाक् झाले असून त्यांनी तिला थेट टायगरची उपमा देत या मूव्सची प्रशंसा केली. या व्हिडिओत ती ऍक्शन ट्रेनर राकेश यादवच्या मदतीने हवेत किक्स परफॉर्म करताना दिसते.
दरम्यान, सलमान खानच्या आगामी “भारत’ चित्रपटात दिशा पाटनी झळकणार आहे. यात ती राधाची भूमिका साकारणार आहे, जी चित्रपटात सलमानची मुलगी आहे. या चित्रपटात दिशाने खुप स्टंटही केले आहेत. अली अब्बास जाफर यांनी दिग्दर्शित केलेला “भारत’ चित्रपट पुढील वर्षी 5 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. यात सलमान आणि दिशाशिवाय कतरिना कैफ, तब्बू, सुनील ग्रोवर, जॅकी श्रॉफ, नोरा फतेही आणि आसिफ शेख अशी कलाकारांची फौज आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा