मादाम तुसॉं संग्रहालयात दीपिकाचा मेणाचा पुतळा

अभिनेत्री दीपिका पादुकोणने केवळ बॉलिवूड नव्हे तर हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. दीपिकाचा लंडनच्या जगप्रसिद्ध मादाम तुसॉं संग्रहालयात दीपिकासारखा हुबेहुब दिसणारा मेणाचा पुतळा उभारण्यात आला. नुकतेच दीपिकाने अलीकडे या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी दीपिकाचे आई-वडिल तर उपस्थित होतेच, शिवाय रणवीर सिंग देखील हजर होता. दीपिकाचा हा पुतळा बघताच तो थक्क झाला.

पुतळा पाहुन रणवीरची नजर पुतळ्यावरून हटत नव्हती.दीपिकाचे सौंदर्य मादाम तुसॉं संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या पुतळ्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे. हा पुतळा हुबेहूब दीपिकासारखाच असल्याने रणवीर त्या पुतळ्याकडे एकटक पाहतच राहिला. रणवीरने दीपिकाचा हा मेणाचा पुतळा पाहिला आणि तो त्या पुतळ्याच्याही प्रेमात पडला. यापूर्वी अमिताभ बच्चन, अनुष्का शर्मा, माधुरी दीक्षित, हेमामालिनी, शाहरुख खान यांच्यासारख्या डझनभर बॉलिवूड सेलिब्रिटीजचे पुतळे या संग्रहालयामध्ये उभारण्यात आले आहेत. दीपिकाने आयफा अवार्डस 2016 मध्ये जो लाचा घातला होता, त्याच लाचात दीपिकाचा हा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)