नागरिकत्वाच्या मुद्दयावरून आक्षेपाला दीपिकाचा मुंहतोड जवाब

दीपिकाचा जन्म डेन्मार्कमध्ये झाला आहे. त्यामुळे तिच्या भारतीय नागरिकत्वाबाबत प्रश्‍न उपस्थित केले जायला लागले आहेत. दीपिका भारतीय नागरिक नसल्यामुळेच तिला लोकसभा निवडणूकीत मतदान करता येणार नाही, अशी चर्चा काही दिवसांपूर्वी रंगायला लागली होती. मात्र या बाबत दीपिकाची प्रतिक्रिया लक्षात न घेताच ही चर्चा रंगवली जात होती. दीपिकाचे म्हणणे आहे तरी काय, हे जेंव्हा तिला विचारले, तेंव्हा तिने “बकवास’ असा एकच रिमार्क दिला.

आपल्याकडे भारतीय पासपोर्ट आहे आणि आपण निःसंदिग्धपणे भारतीय नागरिक असल्याचे तिने ठामपणे सांगितले. दीपिकाचा जन्म जरी डेन्मार्कमध्ये झाला असला, तरी तिने भारतीय नागरिकत्व मिळवलेले आहे. भारतीय नागरिकत्व मिळवणे खूप अवघड होते, मात्र अखेर हे मिळवणे शक्‍य झाले असे दीपिका म्हणाली. आता लवकरच दीपिका मतदान देखील करू शकेल आणि मतदानानंतर शाईचा ठिपका लावलेले बोट दाखवताना तिचे फोटो सेलिब्रिटी लीस्टमध्ये छापूनही येऊ शकतील. दीपिका सध्या “छपाक’मध्ये ऍसिड हल्ला पीडीत मुलीचा रोल करते आहे. यासाठी तिला मेक अपवर विशेष लक्ष केंद्रीत करावे लागते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)