ऍसिड हल्ल्यातील पीडीत मुलीच्या रोलमधील दीपिकाचा लुक रिलीज

मेघना गुलजार दिग्दर्शित “छपाक’चे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवाल या मुलीचा रोल दीपिका यामध्ये करते आहे. दीपिकाचा फोटो बघितल्यावर तिला ओळखणेही कठिण होते आहे. या पोस्टरमध्ये दीपिका हुबेहुब लक्ष्मी अग्रवाल सारखी दिसते आहे. लक्ष्मी अग्रवालवर 2005 साली एकतर्फी प्रेमप्रकरणातून ऍसिड हल्ला झाला होता. त्या हल्ल्यानंतर लक्ष्मीने ऍसिड खुलेपणाने विकत मिळण्याविरोधात कायदेशीर लढा दिला होता. तिच्या प्रयत्नांनंतर ऍसिड विक्रीसाठी कडक अटी असलेला कायदा करण्यात आला होता.

या पोस्टरमध्ये दीपिका आरशासमोर दिसते आहे. हा रोल दीपिकासाठी इतका आव्हानात्मक आहे की आपल्या करिअरमधील सर्वात अवघड रोल आपण साकारत असल्याचे दीपिकाने म्हटले आहे. सिनेमामध्ये दीपिका साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचे नाव मालती असणार आहे. “छपाक’चे पहिले पोस्टर दीपिकाने सोशल मिडीयावर शेअर केले अणि त्याखाली “मालकीचा रोल नेहमी माझ्याबरोबर राहिल.’ असे आवर्जुन लिहीले. तिच्या या पोस्टरवर फॅन्स आणि बॉलिवूडमधील सेलिब्रिटीजनेही प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. “छपाक’ 10 जानेवारी 2020 रोजी रिलीज होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)