‘छपाक’ चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित 

अॅसिड अटॅक पीडित लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनावर आधारित ‘छपाक’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या मध्यवर्ती भूमिकेत दीपिका पदुकोण झळकणार आहे. या फोटमध्ये दीपिका पदुकोण पूर्णतः लक्ष्मी अग्रवाल यांच्यासारखी दिसत आहे.

छपाक चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहे. तर दीपिका पदुकोणही या चित्रपटाची निर्मिती करत आहे. दीपिकासह विक्रांत मेसीही चित्रपटात मुख्य भूमिका निभावत आहे. या चित्रपटात दीपिकाचे नाव मालती असणार आहे.

दरम्यान, लक्ष्मी अग्रवाल यांच्यावर २००५ साली अॅसिड अटॅक झाला होता. त्यावेळी लक्ष्मी केवळ १५ वर्षाच्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)