’83’ सिनेमात रणवीर सोबत काम करण्यास दीपिकाचा नकार

बाॅलीवूडची डिंपल गर्ल दीपिका पादुकोण 83 या सिनेमात काम करणार नाही. रणवीर सिंग कपिल देव यांच्या बायोपिकमध्ये कपिल देवची भूमिका साकारत आहे. सिनेमात कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका दीपिका पादुकोण साकारणार अशी चर्चा होती मात्र आता दीपिकाने या सिनेमात काम करण्यास नकार दिला आहे अशी चर्चा होत आहे.

’83’ हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला होता. दिग्दर्शक कबीर खान हा कपिल देव यांच्यावर आधारित या बायोफिक सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. हा सिनेमा 10 एप्रिल, 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

माहितीनुसार दीपिकाला या सिनेमात कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेसाठी विचारले होते मात्र सिनेमात रणवीर सिंगच्या भूमिकेच्या तुलनेत दीपिकाची भूमिका ही खूपच लहान होती. माहितीनुसार सिनेमात दीपिकाची भूमिका ही विशेष खास नव्हती आणि त्यामुळेच दीपिकाने हा सिनेमा नाकारला, अस सांगण्यात येत आहे. सध्या दीपिकाला मेघन गुलजार यांचा आगामी सिनेमा ‘छपाक’साठी कास्ट करण्यात आले आहे. दीपिका रणवीर सिंग सोबत पद्मावत सिनेमात दिसली होती आणि त्यानंतर मागील वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात या जोडीनं इटलीत लग्न केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)