#Video : मादाम तुसाँमध्ये दिपीका पदुकोनचा मेणाचा पुतळा; रणवीरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मादाम तुसाँमध्ये दिपीकाचा मेणाचा पुतळा,रणवीरने दिली ही प्रतिक्रिया

बाॅलीवूड अभिनेत्री दिपीका पदुकोनचा मेणाचा पुतळा लंडन येथील विख्यात मादाम तुसाँ संग्रहालयात उभारण्यात आला आहे. दीपिका हिने गुरूवारी रणवीर सिंह यांच्यासोबत लडंनमध्ये या पुतळ्याचे अनावरण केले. इंस्टाग्राम लाईव्दारे दीपिकाने देशातील आणि परदेशातील घरी बसलेल्या चाहत्यांना याबाबतची माहिती दिली…. सविस्तर बातमीसाठी… https://goo.gl/nCspnH

Posted by Dainik Prabhat on Thursday, 14 March 2019

मुंबई – बाॅलीवूड अभिनेत्री दिपीका पदुकोनचा मेणाचा पुतळा लंडन येथील विख्यात मादाम तुसाँ संग्रहालयात उभारण्यात आला आहे. दीपिका हिने गुरूवारी रणवीर सिंह यांच्यासोबत लडंनमध्ये या पुतळ्याचे अनावरण केले. इंस्टाग्राम लाईव्दारे दीपिकाने देशातील आणि परदेशातील घरी बसलेल्या चाहत्यांना याबाबतची माहिती दिली.

मादाम तुसाँ वॅक्स म्युझियमधील दीपीका सोबतचे रणवीर सिंहचे अनेक व्हिडीओ सोशल माध्यमांवर वायरल झाले आहे. वायरल व्हिडीओमध्ये रणवीर सिंह हा दीपीकाच्या मेणाच्या पुतळ्याकडे पाहतच राहिल्याचे दिसत आहे. जेव्हा दीपीकाने त्याला याबदल प्रतिक्रिया विचारली तेव्हा रणवीर म्हणाला, “मी या पुतळ्यास घरी घेऊन जाऊ इच्छितो”.

दीपीका साठी हा सोहळा खास होता. कारण तिच्यासोबत यावेळी रणवीर सिहंच नाही तर पूर्ण भवनानी कुंटुंब आणि तिचे आई-वडील देखील होते.

दरम्यान, मादाम तुसाँमध्ये याआधी ऐश्वर्या राय, शाहरुख खान, सलमान खान, ऋतिक रोशन, माधुरी दीक्षित यांचेही पुतळे उभारण्यात आले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)