रणवीर सिंहसाठी दीपिका ठरली “लक्‍की चार्म’

रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा विवाहसोहळा हा 2018मधील बहुचर्चित विवाहसोहळ्यापैकी एक होता. बॉलीवूडमधील या दोन स्टार कलाकार एकमेकांच्या रेशीम बंधनात अडकल्याने त्यांचे चाहते खुप उत्साहीत आणि आनंदित होते. दरम्यान, रणवीर सिंहसाठी हे लग्न खूपच लक्‍की ठरले आहे. लग्नानंतर लगेच प्रदर्शित झालेला त्याचा “सिंबा’ चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर चांगलीच धम्माल करत आहे. रणवीर सिंहचा पहिला सोलो हिट चित्रपट आहे जो 100 कोटी क्‍लबमध्ये सामील झाला आहे.

“प्रत्येक यशस्वी पुरूषामागे एका स्रीचा हात असतो’ ही म्हण रणवीरसाठी खरी ठरताना दिसत आहे.दीपिकासोबत लग्न झाल्यानंतर प्रदर्शित झालेल्या पहिल्याच चित्रपटाने मोठे यश मिळविल्याने रणवीरसाठी दीपिका ही लक्ष्मीच ठरली आहे. रणवीर सिंह याने 2018ची दमदार सुरूवात दीपिका पादुकोणसोबत “पद्मावत’ने केली, तर वर्षाअखेर “सिंबा’ चित्रपटाने झाली. या चित्रपटाचा जलवा आताही बॉक्‍स ऑफिसवर कायम आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बॉलीवूडमधील ही सुपरहिट जोडी “गलियों की रास लीला’, “बाजीराव मस्तानी’ आणि “पद्मावत’ चित्रपटात एकत्रीत झळकली आहे. या सर्व चित्रपटातील रणवीर-दीपिकाच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. त्यानंतर ही जोडी ख-या आयुष्यातही एकमेकांचे जीवनसाथी बनले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)