मुंबई – बॉलिवूड क्वीन कंगना रनौत, टीव्ही अभिनेत्री हिना खाननंतर आता बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदकोणनं कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर दिमाखदार अंदाजात एंट्री केली. दीपिका मागच्या 2 वर्षांपासून या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत असून यंदाचं हे तिचं तिसरं वर्ष आहे. मागील दोन वर्षांपेक्षा यंदा दीपिका काहीशा हटके अवतारात कानमध्ये सहभागी झाली. दीपिकानं कान 2019साठी ऑफ व्हाइट कलरच्या डीप नेक गाऊनची निवड केली आहे. यावर मोठे डायमंड इयरिंग्स कॅरी केले असून हाय पोनीटेल मध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका ‘लॉरियल’ कंपनीची अॅम्बेसिडर म्हणून हजेरी लावणार आहे.
काही दिवसांपूर्वी, न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्युझिअम ऑफ आर्टमध्ये संपन्न होत असलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या कॉस्टयूम पार्टीमध्ये दीपिका पादुकोन यांनी उपस्थिती लावली होती. मेट गाला Met Gala 2019 इव्हेंटमध्ये जगभरातील तारे-तारकांचा जलवा पाहायला मिळाला. या इव्हेंटमध्ये दीपिका पदुकोनने बार्बीसारखा गाउन परिधान केला होता.