वैर विसरून दीपिकाने कतरिनाला दिले निमंत्रण 

रणवीर सिंह आणि दीपिकाच्या लग्नाचे सोहळे आता उरकत आले आहेत. इटलीमध्ये 18 नोव्हेंबरला विवाह बंधनात अडकल्यानंतर 22 नोव्हेंबरला बेंगळूरुमध्ये पहिले रिसेप्शन पार पडले. त्यानंतर 28 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला हे दोघेजण मुंबईत भव्य रिसेप्शन देणार आहेत. त्यामध्ये संपूर्ण बॉलिवूड विश्‍वातील पब्लिक उपस्थित राहणे अपेक्षित आहे. अन्य तारकांसमवेत अनुष्का शर्मा, रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. कतरिना आणि दीपिकाच्यामध्ये गेल्या काही काळापासून शीतयुद्ध चालू आहे.

पहिल्यांदा दीपिका आणि मग कतरिना या रणबीर कपूरच्या गर्लफ्रेंड होत्या. कालांतराने दोघींचाही रणबीर कपूरबरोबर ब्रेक अप झाला. या ब्रेक अपला या दोघीजण एकमेकींनाच जबाबदार धरत होत्या. तेंव्हापासून दोघींमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र रणवीर सिंहबरोबर विवाह झाल्यावर दीपिकाने कतरिनाबरोबरच्या या “कॅट फाईट’ला पूर्णविराम दिला आहे. तिने कतरिनाबरोबर नव्याने मैत्री करण्यासाठी हात पुढे केला आहे. तिचे हे निमंत्रण स्वीकारून कतरिनाही रिसेप्शनला येण्यास तयार झाली आहे. जर सगळे नियोजनानुसार पार पडले तर कतरिना या पार्टीमध्ये सलमान खान किंवा अली अब्बास जाफरबरोबर सहभागी होण्याची शक्‍यता आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup: Thumbs up
2 :heart: Love
0 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
3 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)