मुंबई – बॉलिवूडची चर्चेत असलेली जोडी रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्या विवाहाची चर्चा गेल्या 6 महिन्यांपासून रंगते आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी दीपिकाने लग्नाची पत्रिका सोशल मिडीयावर शेअर केली होती. आजपासून 15 नोव्हेंबर पर्यंत दीपिका आणि रणवीर लग्नसोहळा साजरा करणार आहे. तसेच हा लग्न सोहळा इटलीत होणार आहे. लग्नासाठी रणवीर आणि दीपिका इटलीला जात असल्याचे फोटो सोशल मीडियावर बघितले जात आहे.
दरम्यान, लग्न सोहळ्यानंतर बंगळुरु आणि मुंबईत रिसेप्शन पार्टी होणार आहे. या दोघांच्या लग्नाचे रिसेप्शन कार्ड समोर आले आहे. 21 नोव्हेंबरला बंगळुरु तर 28 नोव्हेंबरला मुंबईतील हॉटेल ग्रँड हयातमध्ये रिसेप्शन पार्टी होईल.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0