दीपवीरचा लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन डे

बॉलिवूडमधील सर्वात ट्रेंडिंग सेलिब्रिटी कपल असलेले रणवीर सिंह आणि दीपिकाचा लग्नानंतरचा पहिलाच “व्हॅलेंटाईन डे’साजरा होतो आहे. गेल्या वर्षी इटलीमध्ये विवाहबद्ध झाल्यानंतर या जोडीला बॉलिवूडमध्ये सर्वाधिक “मिडीया कव्हरेज’ मिळाले होते. “व्हॅलेंटाईन डे’निमित्त काही खास प्लॅन केले आहे का, असे विचारल्यावर “रणवीरचा “गली बॉईज’बघून यंदाचा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रिट करणार आहे.’असे दीपिकाने सांगितले. दीपिकाचे आई वडील मुंबईला येणार असल्याने सगळा दिवस ती रणवीर आणि आपल्या कुटुंबीयांसमवेतच असणार आहे.

दीपिकाने स्वतःसाठी काही नियम बनवले आहेत. रणवीरनेही हे रुल्स फॉलो करावेत, अशी तिची अपेक्षा आहे. आपण जेवढे जास्त व्यस्त होत जातो, तेवढे स्वतःकडे दुर्लक्ष व्हायला लागते. त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यासाठी पुरेशी झोप आणि आरोग्यवर्धक आहार महत्वाचा आहे. त्याचे पालन रणवीरने करावे. दीपिकाने प्रेमाने केलेली ही विनंती रणवीर नक्की ऐकेल. लग्नानंतरच्या पहिल्या वहिल्या व्हॅलेंटाईन डे निमित्त जर पत्नीने एवढी साधी अपेक्षा व्यक्‍त केली असेल, तर कोण त्याला नकार देईल.

अर्थात ही काही दीपिकाने रणवीरला दिलेली आज्ञा नाही. पण एक स्वाभाविक अपेक्षा आहे. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने रणवीरने याचे पालन करण्याची शिस्त स्वतः लावून घेण्याची तिची अपेक्षा आहे. दीपिका लवकरच “छपाक’मध्ये दिसणार आहे. ऍसिड अटॅक झालेल्या लक्ष्मी अगरवाल या मुलीची कथा असलेल्या “छपाक’च्या निमित्ताने दीपिका पहिल्यांदाच निर्माती बनणार आहे.

“गली बॉय’मध्ये रणवीर आणि आलिया भट यांचे काही इंटिमेट सीन आहेत. पण त्याला सेन्सॉरने कात्री लावली आहे. त्यामुळे दीपिका आणि रणबीर कपूर दोघांनाही जरासे बरे वाटले असेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)