दीपवीर हनीमूनला रवाना !

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह ही बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत असेलेल्या जोडीचे लग्न होऊन दीड महिना झाला आहे. बिझी शेड्युलमुळे दोघांनाही एकमेकांबरोबर वेळ घालवण्यासाठी वेळ मिळत नव्हता. दोघांच्या लग्नाकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले होते. त्याचप्रमाणे हे दोघे हनीमूनसाठी कोणत्या ठिकाणी जाणार याचीही साऱ्यांना उत्सुकता होती. अखेर वेळात वेळ काढून दोघेही हनीमूनसाठी रवाना झाले आहेत.

विशेष म्हणजे दोघांनाही विविध देशांच्या पर्यटन मंडळांकडून पेड हनीमून ट्रीप पॅकेजेस ऑफर करण्यात आले होते. यांत स्वित्झर्लंड पर्यटन मंडळ आघाडीवर होते. कारण रणवीर सिंह हा स्वित्झर्लंड पर्यटन मंडळाचा भारतातील ब्रॅंड ऍम्बेसेडर आहे. या नवदाम्पत्याला सुंदर ठिकाणी हनीमूनला जाण्यासाठी खास आमंत्रण पाठवण्यात आले होते. त्यानुसार ही जोडी त्यांच्या मधुचंद्रासाठी रवाना झाली. काल रात्री मुंबई एअरपोर्टवर दोघेही हातात हात घालून दिसले. नेहमीप्रमाणे यावेळीही दोघांच्या हटके स्टाइल स्टेटमेंटही सा-यांचे लक्ष वेधून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. दोघांसाठी त्यांचे हनीमूनही थोडे खास असणार आहे. ते म्हणजे लग्नानंतर त्यांचे हे पहिले न्यु इअर असणार आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)