दीपा कर्माकर ’23’ व्या स्थानावर

नवी दिल्ली – भारताची अव्वल जिम्नॅस्टपटू दीपा कर्माकरला जर्मनी येथे सुरु असलेल्या तालबद्ध जिम्नॅस्टिक विश्‍वचषक स्पर्धेत बॅलेन्स बीम प्रकारात 23व्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. तर वोल्ट प्रकारात तिने अंतिम फेरीतील आपले स्थान निश्‍चित करताना दोन प्रकारात मिळून 11.066 गुण मिळवले आहेत. या प्रकारात एकूण 32 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.

दुसरीकडे, राकेश पात्रा याने समांतर बार पात्रता फेरीत दोन प्रयत्नात 13.033 गुण मिळवत 29 खेळाडूं मधून 16 वे स्थान प्राप्त केले आहे.

-Ads-

तर पुरुषणाच्या वॉल्ट प्रकारात आशिष कुमारने 12. 866 गुण मिळवत 27 खेळाडूंमध्ये 23वे स्थान मिळवले आहे. पहिल्या दिवशी झालेल्या दुखापतीमुळे अन्य भारतीय खेळाडू अर्जुन रेड्डी मैदानात आला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)