डीप व्हेन थ्रोम्बोसिस :योग्य वेळेत तपासणी गरजेची

डॉ. संजय अग्रवाल
डीप व्हेन थ्रोम्बोसिस अर्थात डीवीटीची सर्वात मोठी जोखीम की आहे की, जेव्हा रक्‍ताच्या गाठीचे तुकडे होऊन ते शेवटी रक्‍ताबरोबरच फुफ्फुसांपर्यंत पोहचतात. ही प्रक्रिया म्हणजे पलमोनरी एम्बोजिम. काय आहे हा आजार आणि काय आहेत त्यावरचे उपचार?
डीप व्हेन थ्रोम्बोसिस म्हणजे डीवीटी ही नेहमीसाठी एक अज्ञात असलेली रोगविषयक स्थिती आहे. जिथे मुख्य शिरेमध्ये (नस) रक्‍त जमा होते. आणि त्यामुळे रक्ताचा प्रवाहपूर्णपणे किंवा अंशता: थांबून जातो. याचा सर्वात जास्त प्रभाव पायांवर पडतो. पायात सूज, विशेषत: आपल्या पायाच्या पोटऱ्यावर किंवा टाचेमध्ये बघितली जाते. जे व्यक्ति डीवीटीने ग्रस्त असतात, त्यांच्यासाठी हे एक नेहमीचे लक्षण आहे. काही रुग्णांना तर असाही अनुभव असेल की, ते जेव्हा जेव्हा उभे राहतात किंवा चालतात तेव्हा त्यांच्या पोटऱ्या किंवा जांघेमध्ये खूप त्रास होतो.
डीवीटीची सर्वात मोठी जोखीम ही आहे की, जेव्हा रक्‍ताच्या गाठीचे तुकडे होऊन ते शेवटी रक्‍ताबरोबरच फुफ्फुसांपर्यंत पोहचतात. ही प्रक्रिया म्हणजे पल्मोनरी एम्बोजिम. ही एक अशी स्थिती आहे की, जी आपल्या जीवनासाठी खूप घाबरवणारी आहे. रक्‍ताच्या गुठळीचे तुकडे फुफ्फसांमध्ये जायच्या वेळेपासून ते 30 मिनिटांपर्यंत कुठल्याही व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. काही रुग्णांमध्ये असे आढळून आले आहे की, या आजाराचे कुठलेही लक्षण दिसून किंवा जाणून येत नाही. काहीही असलं तरीही हा रोग या रोगाच्या विशेषज्ञासाठीही एक गुप्तरोगासारखाच आहे. याचबरोबर याला एक संभाव्य आव्हान मानूून लवकरात लवकर दूर करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. तसेच या रोगाच्या बाबतीतली अजून विस्तृत माहिती मिळवली गेली पाहिजे. डीवीटी एक आयुष्यभर घाबरवणारी स्थिती आहे.
कधी कधी याला “इक्‍नॉमी क्‍लॉस सिंड्रोम असेही म्हटले जाते कारण की, मानसाच्य आर्थिक विकासाबरोबर या विकाराच्या वाढण्याची शक्‍यताही तितकीच वाढीस लागते. जेव्हा शरीरातील विविध हालचाली थांबून जातात, जसे की, जेव्हा तुम्ही लांब विमान प्रवास करता त्यावेळी प्रवासात पायांचे सुन्न पडणे, अशी स्थिती तेव्हाच उत्पन्न होते जेव्हा शरीरात कुठल्या तरी भागात एके ठिकाणीच रक्‍त जमा होत जातं. जास्त करून पायांच्या लांब शिरांमध्ये, खांदे किंवा हातांमध्ये असे होते.
डीवीटीच्या तीन रुग्णांमधून फक्‍त दोनच रुग्ण वाचवले जाऊ शकतात. भारतीय अभ्यासातून हे वास्तव समोर आले आहे की, भारतीय रुग्णांमध्ये डीवीटी या रोगाचे डायग्नोसिस होणे हाच एक नित्यक्रम आहे, विशेष करून तो रुग्ण ज्या इस्पितळात भरती होतात तिथे, आणि अन्य अभ्यासातून हे समजून येते की, भारतीय रुग्णांमध्ये पोस्ट-ऑपरेटिव डीवीटीची घटना पश्‍चिम भागांमध्ये “लोअर लींब सर्जरी’च्या रूपात जास्त प्रमाणात बघावयास मिळत आहे. याचे कारण म्हणजे तपासणीसाठी माहितीची कमी असणे, यामुळे आजाराच्या प्रमाणाचा अंदाज लावला जाऊ शकतो. जवळ जवळ 60 टक्‍के रुग्णांना डीवीटी रोगाचा प्रतिबंध झाला नाही, म्हणून त्यांना “लोअर लिंब सर्जरी’ करावी लागली. आजकाल एवढ्या प्रगतशील मेडिकल क्षेत्रात जर योग्य वेळी योग्य उपचार केला गेला तर डीवीटीपासून बचाव केला जाऊ शकतो.

खबरदारी … 

जी लोकं पहिल्यापासून डीवीटीने त्रस्त आहेत त्यांना सहन न होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी काही सावधानी बाळगली पाहिजे. शरीरात तयार होणाऱ्या रक्ताच्या गाठी बनण्याच्या प्रक्रियेपासून सुटका मिळवण्यासाठी रक्‍त पातळ करण्याच्या औषधी जसे की, एस्पिरीन एक खूप चांगली गोळी आहे.
लांब प्रवास करायच्या आगोदर थोडी एस्परीन घेतली पाहिजे. यामुळे डीवीटी होण्याची शक्‍यता खूप कमी होते. जेव्हा तुम्ही बसता तेव्हा पायांचा विशिष्ट व्यायाम करणे जसे टाचा फिरवणे, पायाची बोटे हालवणे असे व्यायाम केले गेले पाहिजेत. त्यामुळे पायांमध्ये रक्त एकत्र होणार नाही आणि त्यानंतर शरीररात रक्‍ताचा प्रवाह एकसारखा होत राहील. अनेकदा ऑपरेशननंतर लोकं लगेचच लवकरात लवकर अंथरूण सोडण्यासाठी उत्सुक असतात या कारणामुळेसुद्धा लोकांना डीवीटी होण्याची शक्‍यता असते.
डीवीटीच्या निदानासाठी सुरुवातीला नेहमीसाठी इंजेक्‍शनच्याद्वारे हैपरीनची उच्च मात्रा दिली जाते. तसेच वारफैरीनची पण औषधे काही महिन्यांसाठी खाण्याचे निर्देश देण्यात येतात. जोपर्यंत ह्या रक्‍त पातळ करण्याच्या औषधी घेतल्या जातात, तोपर्यंत रुग्णाला आपल्या रक्‍ताची चाचणी रोज करायलाच लागते, कारण रुग्ण रोज सांगितलेल्या पद्धतीने रोजच्या रोज वेळेवर औषधी घेतो की नाही की, हिमोरेजच्या धोक्‍यात तर नाहीये, हे पहावे लागते. डीवीटीच्या लक्षणांपासून वाचण्यासाठी वेदनाशामक व त्या स्थानाला गर्मी पोहचवणारी औषधं घेण्यासाठी डॉक्‍टरकडून सल्ला दिला जातो. त्यानंतर रुग्ण कुठेही जाऊ येउ शकतो.
तरुणांमध्ये डीवीटीची संभावना खूप कमी असते, ज्यांचे वय 40 पर्यंत असते त्यांना हा आजार सर्वसाधारणपणे होतो. आपणसुद्धा डीवीटीच्या धोक्‍यात असाल तर ताबडतोब तुमच्या डॉक्‍टरांशी संपर्क साधा.

निदान आणि उपचार 

आज काल डीवीटीची अल्ट्रासाउंडद्वारे पण माहिती मिळू शकते. डॉक्‍टरांचा विश्‍वास आहे की, या प्रकारचा प्रयोग करून ते छोट्या छोट्या रक्‍ताच्या गाठींचा पत्ता लावू शकतात. रक्‍ताची चाचणी घेऊनसुद्धा थ्रोम्बोसिसचा शोध लावला जाऊ शकतो, जो एक खूप चांगला पर्याय मानला जातो. एक अशी परीक्षा की, जी क्‍लोटिंग नंतरच्या बाय-प्रोडक्‍ट्‌सचे प्रमाणाला सुद्धा मोजते. त्याला डी-डीमर असे म्हणतात आणि त्याचा उपयोग आज काल सर्वत्र केला जातो. डीवीटीचे चांगल्या प्रकारच्या उपचारासाठी लवकर निदान आणि लगेच रोग निरोधन आणि संपूर्ण उपचार हेच निर्णायक ठरत आहेत. डीवीटीपासून बचाव मिळवण्यासाठी काही गोष्टींना आपलेसे केले पाहिजे. जसे…
  • सर्व हॉस्पिटल्समध्ये डीवीटीची तपासणी ची व्यवस्था करणे.
  • डीवीटीपासून बचाव करण्यासाठी चांगल्या आणि अधिकृत रिपोर्टसमधून माहिती घेणे.
  • लोकांना डीवीटीची योग्य ती माहिती देऊन त्यांना यासंबधीच्या बाबतीत योग्य ती काळजी घेण्यासाठी सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करून देणे.
  • रुग्णांना डीवीटीच्या जोखिमांची माहिती देऊन सल्ले दिले पाहिजेत. कारण जास्त त्रासाच्यावेळी ते डीवीटीच्या वेगवेगळ्या पायऱ्यांना ओळखू शकतील.
  • जास्तीत जास्त प्रमाणात पाणी व फळांचा रस पिणे.
  • दारू न पिणे.
  • सकाळी लवकर उठणे व जेवढे शक्‍य आहे तेवढे फिरणे.
  • जेव्हा तुम्ही बसलेला असता तेव्हा प्रयत्न करा की, आपल्या पायांना व आपापल्या पायांच्या बोटांना वरती व खालच्या दिशेने फिरवा.
  • रक्‍ताच्या प्रावाहाला सुधारण्यासाठी इलास्टिकचा योग्य दबाव असणारे कपडे वापरा.
  • पायांना मोडून बसण्याचा कमीत कमी प्रयत्न करा आणि जास्त तंग किंवा कसलेले कपडे वापरण्यापासून दूर रहा.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)