डीप व्हेन थ्रोम्बोसिस; खबरदारी (भाग-3)

-डाॅ.संजय अग्रवाल

डीप व्हेन थ्रोम्बोसिस म्हणजे डीवीटी ही नेहमीसाठी एक अज्ञात असलेली रोगविषयक स्थिती आहे. जिथे मुख्य शिरेमध्ये (नस) रक्त जमा होते. आणि त्यामुळे रक्ताचा प्रवाह पूर्णपणे किंवा अंशता थांबून जातो. याचा सर्वात जास्त प्रभाव पायांवर पडतो. पायात सूज, विशेषता आपल्या पायाच्या पोटऱ्यावर किंवा टाचेमध्ये बघितली जाते. जे व्यक्ति डीवीटीने ग्रस्त असतात, त्यांच्यासाठी हे एक नेहमीचे लक्षण आहे. काही रुग्णांना तर असाही अनुभव असेल की, ते जेव्हा जेव्हा उभे रहातात किंवा चालतात तेव्हा त्यांच्या पोटऱ्या किंवा जांघेमध्ये खूप त्रास होतो.

घ्यावयाची खबरदारी …

जे लोक पहिल्यापासून डीवीटीने ग्रस्त आहेत त्यांनी यांच्या सहन न होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी काही सावधानी बाळगली पाहिजे. शरीरात तयार होणाऱ्या रक्ताच्या गाठी बनण्याच्या प्रक्रिये पासूनसुटका मिळवण्यासाठी रक्त पातळ करण्याच्या औषधी जसे कि एस्परीन एक खूप चांगली गोळी आहे. लांब प्रवास करायच्या अगोदर थोडी ऍस्पिरीन घेतली पाहिजे. यामुळे डीवीटी होण्याची संभावना खूप कमी होते.

जेव्हा तुम्ही बसता तेव्हा पायांचा विशिष्ट व्यायाम करणे जसे टाचा फिरवणे, पायाची बोटे हालवणे असे व्यायाम केले गेले पाहिजेत त्यामुळे जेणे करून पायांमध्ये रक्त एकत्र होणार नाही आणि त्यानंतर शरीररात रक्ताचा प्रवाह एकसारखा होत राहील. ऑपरेशननंतर लोकं लगेचच लवकरात लवकर अंथरूण सोडण्यासाठी जागरूक असतात या कारणामुळेसुद्धा लोकांना डीवीटी होण्याची शक्‍यता असते…

डीवीटीच्या निदानासाठी सुरुवातीला नेहमीसाठी इंजेक्‍शनच्याद्वारे हैपरीनची उच्च मात्रा दिली जाते. रुगणाला वारफैरीनची पण औषधे काही महिन्यांसाठी सेवन करण्याचे निर्देश देण्यात येतात. जोपर्यंत ह्या रक्त पातळ करण्याच्या औषधी घेतल्या जातात, तोपर्यंत रुग्णाला आपल्या रक्ताची चाचणी रोज करायलाच लागते, कारण रुग्ण रोज सांगितलेल्या पद्धतीने रोजच्या रोज वेळेवर औषधी घेतो की नाही अथवा हिमोरेजचा धोका तर नाही, हे पहावे लागते.

डीवीटीच्या लक्षणांपासून वाचण्यासाठी वेदनाशामक व त्या स्थानाला उष्णता पोहचवणारी औषधं घेण्यासाठी डॉक्‍टरांकडून सल्ला दिला जातो. त्यानंतर रुग्ण कुठेही जाऊ-येऊ शकतो. तरुणांमध्ये डीवीटीची संभावना खूप कमी असते, ज्यांचे वय 40 पर्यंत असते त्यांना हा आजार सर्वसाधारणपणे होतो. या करता आपल्याला सूचित केले जाते की आपण जर असा विचार करत असाल तर आपणसुद्धा डीवीटीच्या धोक्‍याते असाल तर ताबडतोब तुमच्या डॉक्‍टरांना संपर्क साधा.

डीप व्हेन थ्रोम्बोसिस (भाग-1)     

डीप व्हेन थ्रोम्बोसिस; निदान आणि उपचार (भाग-2 )


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)