डीप व्हेन थ्रोम्बोसिस; निदान आणि उपचार (भाग-2 )

-डाॅ.संजय अग्रवाल

डीप व्हेन थ्रोम्बोसिस म्हणजे डीवीटी ही नेहमीसाठी एक अज्ञात असलेली रोगविषयक स्थिती आहे. जिथे मुख्य शिरेमध्ये (नस) रक्त जमा होते. आणि त्यामुळे रक्ताचा प्रवाह पूर्णपणे किंवा अंशता थांबून जातो. याचा सर्वात जास्त प्रभाव पायांवर पडतो. पायात सूज, विशेषता आपल्या पायाच्या पोटऱ्यावर किंवा टाचेमध्ये बघितली जाते. जे व्यक्ति डीवीटीने ग्रस्त असतात, त्यांच्यासाठी हे एक नेहमीचे लक्षण आहे. काही रुग्णांना तर असाही अनुभव असेल की, ते जेव्हा जेव्हा उभे रहातात किंवा चालतात तेव्हा त्यांच्या पोटऱ्या किंवा जांघेमध्ये खूप त्रास होतो.

निदान आणि उपचार

आज काल डीवीटीचा अल्ट्रासाउंडद्वारे पण माहीती मिळूअ शकते. डॉक्‍टरांचा विश्‍वास आहे की, या प्रकारचा प्रयोग करून ते छोट्या छोट्या रक्ताच्या गाठींचा पत्ता लावू शकतात. थ्रोम्बोसिसचा रक्ताची चाचणी घेऊनसुद्धा पत्ता लावला जाऊ शकतो, जो की एक खूप चांगला पर्याय मानला जातो.

एक अशी परीक्षा की जी क्‍लोटिंग नंतरच्या बाय-प्रोडक्‍ट्‌सच्या प्रमाणालासुद्धा मोजते. त्याला डी-डीमर असे म्हणतात. त्याचा उपयोग आज काल सर्वत्र केला जातो. डीवीटी चे चांगल्या प्रकारच्या प्रबंधनासाठी त्याचे लवकर निदान आणि लगेच रोग निरोधन आणि संपूर्ण उपचार हेच निर्णायक आहेत.

डीवीटी पासून बचाव मिळवण्यासाठी काही गोष्टींना आपलेसे केले पाहिजे.

-सर्व हॉस्पिटल्स मध्ये डीवीटी तपासणीची व्यवस्था करणे.
-डीवीटीपासून बचाव करण्यासाठी चांगल्या दवाखान्यामधून माहिती घेणे.
-लोकांना डीवीटी ची योग्य ती माहिती देऊन त्यांना यासंबधीच्या बाबतीत योग्य ती काळजी घेण्यासाठी सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करून देणे
-रुग्णांना डीवीटीच्या जोखिमांची माहिते देऊन सल्ले दिले पाहिजेत. कारण जास्त त्रासाच्या वेळी ते डीवीटीच्या वेगवेगळ्या पायऱ्यांना ओळखू शकतील.
-जास्तीत जास्त मात्रेमध्ये पाणी व फळांचा रस पिणे.
-दारू न पिणे
-सकाळी लवकर उठणे व जेवढे शक्‍य आहे तेवढे फिरणे.
-जेव्हा तुम्ही बसलेला असता तेव्हा प्रयत्न करा की, आपल्या पायांना व आपापल्या पायांच्या बोटांना वरती व खालच्या दिशेने फिरवा.
-रक्ताच्या प्रवाहाला सुधारण्यासाठी इलॅस्टिकचा योग्य दबाव असणारे कपडे वापरा.
-पायांना मोडून बसण्याचा कमीत कमी प्रयत्न करा आणि जास्त तंग किंवा कसलेले कपडे वापरण्या पासून बचाव करा.

डीप व्हेन थ्रोम्बोसिस (भाग-1)     

डीप व्हेन थ्रोम्बोसिस; खबरदारी (भाग-3)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)