डीप व्हेन थ्रोम्बोसिस (भाग-1)

-डाॅ.संजय अग्रवाल

डीप व्हेन थ्रोम्बोसिस म्हणजे डीवीटी ही नेहमीसाठी एक अज्ञात असलेली रोगविषयक स्थिती आहे. जिथे मुख्य शिरेमध्ये (नस) रक्त जमा होते. आणि त्यामुळे रक्ताचा प्रवाह पूर्णपणे किंवा अंशता थांबून जातो. याचा सर्वात जास्त प्रभाव पायांवर पडतो. पायात सूज, विशेषता आपल्या पायाच्या पोटऱ्यावर किंवा टाचेमध्ये बघितली जाते. जे व्यक्ति डीवीटीने ग्रस्त असतात, त्यांच्यासाठी हे एक नेहमीचे लक्षण आहे. काही रुग्णांना तर असाही अनुभव असेल की, ते जेव्हा जेव्हा उभे रहातात किंवा चालतात तेव्हा त्यांच्या पोटऱ्या किंवा जांघेमध्ये खूप त्रास होतो.

डीवीटीची सर्वात मोठी जोखीम ही आहे की, रक्ताच्या गाठीचे तुकडे होऊन ते शेवटी रक्ताबरोबरच फुफ्फुसांपर्यंत पोहचतात. ही प्रक्रिया म्हणजे पलमोनरी एम्बोजिम. ही एक अशी स्थिती आहे की, आपल्या जीवनासाठी ती खूप घाबरवणारी आहे.

रक्ताचे तुकडे फुफ्फसांमध्ये जायच्या वेळेपासून ते 30 मिनिटांपर्यंत कुठल्याही व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. काही रुग्णांमध्ये असे आढळून आले आहे की, या आजाराचे कुठलेही लक्षण दिसून किंवा जाणून येत नाही. काहीही असलं तरीही हा रोग या रोगाच्या विशेषज्ञांसाठीही एक गुप्त रोगासारखाच आहे. याचबरोबर याला एक संभाव्य आव्हान मानून लवकरात लवकर दूर करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. किंवा यांच्या बाबतीतली अजून विस्तृत माहिती मिळवली गेली पाहिजे. डीवीटी एक आयुष्यभर घाबरवणारी स्थिती आहे.

कधी कधी याला इक्‍नॉमी क्‍लॉस सिंड्रोम असेही म्हटले जाते डीवीटीच्या विकासाबरोबर इक्‍नॉमी क्‍लॉस सिंड्रोम वाढण्याची शक्‍यताही तितकीच वाढते, जेव्हा शरीरातील विभिन्न हलचाली थांबून जातात, जसे की, जेव्हा तुम्ही लांब विमान प्रवास करता त्यावेळी प्रवासात पायांचे सुन्न पडणे. अशी स्थिती तेव्हाच उत्पन्न होते जेव्हा शरीरात कुठल्यातरी भागात एके ठिकाणीच रक्त जमा होत जातं. पायांच्या लांब शिरांमध्ये, खांदे किंवा हातांत असे होते.

डीवीटीच्या तीन रुगणांपैकी फक्त दोनच रुग्ण वाचवले जाऊ शकतात. भारतीय वैद्यकशास्त्राच्या परिमाणानुसार केलेल्या अभ्यासातून हे तथ्य समोर आले आहे की, भारतीय रुग्णांमध्ये डीवीटी होणे हा एक नित्यक्रम आहे, विशेष करून तो रुग्ण ज्या इस्पीतळात भरती होतात तिथे. अन्य अभ्यासातून हे समजून येते की, भारतीय रुग्णांमध्ये पोस्ट-ऑपरेटिव डीवीटीची घटना पश्‍चिमी भागांत लोअर लींब सर्जरीच्या रूपात जास्त प्रमाणात बघावयास मिळत आहे. याचे कारण म्हणजे तपासणीसाठी माहितीची कमी असणे, यामुळे आजाराच्या प्रमाणाचा अंदाज लावला जाऊ शकतो.

जवळ जवळ 60 टक्के रुग्णांना डीवीटी रोगाचा प्रतिबंध झाला नाही, म्हणून त्यांना लॉवर लिंब सर्जरी करावी लागली. आजकाल एवढ्या प्रगतशील मेडिकल क्षेत्रात जर योग्य वेळी योग्य उपचार केला गेला तरच डीवीटीपासून बचाव केला जाऊ शकतो.

डीप व्हेन थ्रोम्बोसिस; निदान आणि उपचार (भाग-2 )  

डीप व्हेन थ्रोम्बोसिस; खबरदारी (भाग-3)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)