संदिग्ध वातावरणात निर्देशांकांत घट 

औषधी, वाहन, एफएमसीजी क्षेत्रांतील कंपन्या पिछाडीवर 

ऑक्‍टोबर महिना शेअरबाजारासाठी असमाधानकारक राहिला असून अशी परिस्थिती मागील 9 वर्षांनंतर निर्माण झाली आहे. ऑक्‍टोबरमध्ये सेन्सेक्‍स 1,800 अंकानी तर निफ्टी 544 अंकानी घसरणीत राहिला. याच महिन्यात इतकी मोठी घसरण झाली असल्याने भारतीय बाजारात गुंतवणूकदारांना 6 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आगामी काळातही शेअर बाजारातील वातावरण संदिग्ध राहण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई – शुक्रवारी शेअरबाजारात चांगले सकारात्मक वातावरण निर्माण होऊन निर्देशांक उसळले होते. नंतर सरकारने लघु उद्योगासाठी मोठी योजना जाहीर करून चांगली वातावरण निर्मिती केली होती. मात्र सोमवारी सकाळी रुपयाचे मूल्य कमी झाल्यानंतर तो उत्साह मावळला आणि बरीच विक्री झाली. बाजार बंद होताना शुक्रवारच्या तुलनेत निर्देशांक कमी पातळीवर बंद झाले.

सोमवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 60 अंकांनी म्हणजे 0.27 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 34950 अंकावर बंद झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी सेन्सेक्‍स 580 अंकानी वाढला होता. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 29 अंकांनी कमी होऊन 10524 अंकांवर बंद झाला. सकाळच्या सत्रात रुपयाचे मूल्य 76 टक्‍क्‍यानी कमी झाल्यानंतर विक्रीची जोर वाढल्याचे ब्रोकर्सनी सांगितले. त्याचबरोबर जागतिक बाजारातूनही आज फारसे उत्साहवर्धक संदेश आले नाहीत. त्यामुळे औषधी, वाहन, आणि एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यच्या शेअरची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे दिसून आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)