नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील सिंडिकेट बॅंकेने आपल्या कर्जावरील व्याजदरात 0.05 टक्क्यापर्यंत घट केलेली आहे. ही व्याजदर कपात 15 जून पासून लागू होणार असल्याचे कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सर्व कर्जावरील व्याज दर ठरविणाऱ्या एमसीएलआर दरात बॅंकेने कपात केलेली आहे. एक वर्षाचा एमसीएलआर आता 8.6 टक्के करण्यात आलेला आहे. त्यामुळे या प्रमाणात बॅंक देत असलेल्या विविध कर्जावरील व्याजदरात घट होणार आहे.
रिझर्व बॅंकेने आपल्या या मुख्य व्याजदरात 0.75 टक्क्यांची घट करूनही इतर बॅंकांनी मात्र त्याप्रमाणात घट केलेली नाही. मात्र आगामी काळात ही घट वेगाने होण्याची शक्यता रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली. बऱ्याच बॅंकानी आता कर्जावरील व्याजदर रेपो दराशी जोडण्याच्या शक्यतेवर विचार सुरू केला असल्याचे बोलले जाते.