नफेखोरीमुळे निर्देशांकात घट

मुंबई: स्टेट बॅंकेने आज मोठा तोटा झाल्याचा ताळेबंद जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात विक्रीचे वातावरण निर्माण झाले. त्यातच जागतिक बाजारातूनही नकारात्मक संदेश आले. त्यामुळे शेअर बाजार निर्देशांक विक्री पातळीवरून शुक्रवारी कमी झाली. असे असले तरी सलग तिसऱ्या आठवड्यात शेअर बाजार निर्देशांकात वाढ झाली आहे. स्टेट बॅंकेचा शेअर आज 3.79 टक्‍क्‍यानी कोसळला.

बाजार बंद होतांना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 155 अंकानी म्हणजे 0.41 टक्‍क्‍यानी कमी होऊन 37869 अंकावर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 41 अंकानी कमी होऊन 11429 अंकावर बंद झाला. काल सेन्सेक्‍स 137 अंकानी वाढला होता. सरलेल्या आठवड्यात सेन्सेक्‍स 313 अंकानी तर निफ्टी 68 अंकानी वाढला आहे. काल झालेल्या व्यवहाराची माहिती शेअर बाजारानी आज जाहीर केली. त्यानुसार काल परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 370 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केली मात्र देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 85 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली. आज झालेल्या विक्रीचा धातू, सार्वजनिक क्षेत्रातील, भांडवली वस्तू, पायाभूत सुविधा, आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांना जोरदार फटका बसला.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)