नवी दिल्ली – भारतात सोने खरेदीसाठी अक्षय्यतृतीया हा सण शुभ मानला जातो. मात्र तरीही मंगळवारी स्पॉट मार्केटमध्ये दागिने उत्पादकाकडून सोन्याची मागणी कमी होती. या कारणामुळे मंगळवारी दिल्ली सराफात सोन्याचे दर 50 रुपयांनी कमी झाले. त्याचबरोबर चांदीचे दरही दहा रुपयांनी कमी झाले.
अखिल भारतीय सराफा संघटनेने केलेल्या माहितीनुसार जागतिक बाजारात मात्र सोन्याचे दर आज काही प्रमाणात वाढले होते. दिल्ली सराफात मंगळवारी शुद्ध सोन्याचे दर 50 रुपयांनी कमी होऊन 32,670 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तर स्टॅंडर्ड सोन्याचे दर पन्नास रुपयांनी कमी होऊन 32,500 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.
उद्योग क्षेत्राकडून फारशी मागणी नसल्यामुळे मंगळवारी दिल्ली सराफ तयार चांदीचे दर दहा रुपयांनी कमी होऊन 38,120 रुपये प्रति किलो या पातळीवर गेले.