परकीय चलन साठ्यात झाली घट

मुंबई -परकीय चलन साठ्यात सलग तिसऱ्या आठवड्यात घट झाली आहे. 22 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठ्यात 1 अब्ज डॉलरची घट होऊन हा साठा 406 अब्ज डॉलर या पातळीवर आला आहे.

थेट गुंतवणूक, त्याचबरोबर शेअर बाजारात झालेली गुंतवणूक याचा विचार करून परकीय चलन विनिमय दरानुसार या साठ्यांचे मूल्यांकन केले जात असते. 13 एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा 426 अब्ज डॉलर या विक्रमी पातळीवर गेला होता. मात्र, त्यानंतर या साठयात हळूहळू घट होऊ लागली आहे. रिझर्व्ह बॅंकेकडे असलेल्या सोन्याचे मूल्य या आठवड्यात 23 अब्ज डॉलर या पातळीवर कायम राहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)