परकीय चलन साठ्यात झाली घट

मुंबई – देशातील विदेशी राखीव गंगाजळी 2.11 अब्ज डॉलरने घसरून 398.12 अब्ज डॉलरपर्यंत येऊन ठेपली आहे. विदेशी चलन मालमत्तेतील घसरणीमुळे असे घडले आहे. चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशातील विदेशी राखीव गंगाजळी 2.06 अब्ज डॉलरने वाढत 400.24 अब्ज डॉलर होती.

विदेशी राखीव गंगाजळी यापूर्वी 426.02 अब्ज डॉलर अशा विक्रमी टप्प्याला 13 एप्रिल 2018 अखेरच्या आठवड्यात पोहोचली होती. त्यानंतर त्यात सातत्याने घसरण होत आहे. आतापर्यंत त्यात 31 अब्ज डॉलर घसरण झाली आहे. राखीव सोने मात्र यंदा 22.68 अब्ज डॉलर असे स्थिर राहिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)