भगवा ध्वज फडकाऊन घोषणा देणे हा गुन्हा नाही – मुंबई हायकोर्टाचा निर्णय

मुंबई – भगवा ध्वज फडकाऊन घोषणा देणे हा काही गुन्हा ठरत नाही.आणि या प्रकरणात अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वयेही कारवाई करता येणार नाही असे नमूद करीत मुंबई उच्च न्यायालयाने आज या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आलेल्या आरोपीला अटकपुर्व जामीन मंजुर केला. राहुल श्रीकांत महाजन असे यातील आरोपीचे नाव असून त्यांच्या विरोधात कल्याण पोलिसांनी ऍट्रासिटी ऍक्‍ट खाली गुन्हा नोंदवला होता.

या प्रकरणात महाजन यांना विशेष न्यायालयाने गेल्या वर्षी अटकपुर्व जामीन नाकारला होता. तथापी त्यांचे हे प्रकरण दाखल करून घेत उच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेला तात्पुरती मनाई केली होती. महाजन यांच्या विरोधात कल्याण पोलिसांनी 3 जानेवारी 2018 ला ऍट्रॉसिटी ऍक्‍ट खाली गुन्हा दाखल केला होता. पण आपले कोणतेच कृत्य या कायद्या खाली येत नाहीं त्यामुळे पोलिस आपल्याला या प्रकरणात अटक करू शकत नाहींत अशी भूमिका महाजन यांनी हायकोर्टात घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्या विरोधात जो एफआयआर दाखल आहे त्यात केवळ आपण भगवा ध्वज फडकाऊन घोषणाबाजी केली एवढाच आरोप आहे. हा आरोप ऍट्रॉसिटी अंतर्गत येत नाही असे त्यांचे म्हणणे न्यायालयाने मान्य केले. भीमा कोरेगावला झालेल्या जातीय दंगलीच्या प्रकरणात महाजन आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने आयोजित केली होती. त्यावेळी त्यांच्या विरोधात कल्याण पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला होता.

आरोपींनी जयभवानी, जय महादेव, जय शिवराय अशा घोषणा दिल्या होत्या. त्यात कोणाचाही अवमान झालेला नाही अशीही आरोपींची भूमिका होती. त्यांचा हा युक्तिवाद मान्य करताना न्यायालयाने म्हटले आहे की भगवा ध्वज फडकावणे आणि अशा प्रकारची घोषणाबाजी करणे हा ऍट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा ठरत नाही त्यामुळे या गुन्ह्याखाली संबंधीत आरोपीला अटक करता येणार नाही असे नमूद करीत न्यायालयाने त्यांचा अटकपुर्व जामीन मंजुर केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)