जुलै महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट

नवी दिल्ली: जुलै महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत काही प्रमाणात घट झाली आहे. मात्र गेल्या वर्षी या काळात जीएसटीची अंमलबजावणी सुरू होती, त्यामुळे विक्री वाढली होती. त्यामुळे तुलनेसाठीचा आधार जरा जास्त होता. त्यामुळे काळजीचे कारण नसल्याचे वाहन उत्पादकांची संघटना सियामने म्हटले आहे.

जुलै महिन्यात 290960 इतक्‍या प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात 299066 इतक्‍या प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. या महिन्यात कारची विक्रीही कमी होऊन 191979 इतकी झाली आहे, जी की गेल्या वर्षी जुलै महिन्यात 192845 इतकी होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सियामने म्हटले आहे की, या वर्षात या उद्योगातील सर्व क्षेत्राची उत्पादकता वाढत आहे. पहिल्या चार महिन्यात 1 कोटी वाहनाची निर्मीती झाली आहे. यात 17 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षात या काळात 93 लाख वाहनांची निर्मिती झाली होती. पुढील दोन वर्षात वाहन निर्मिती आणि विक्रीत वाढ होत जाण्याची शक्‍यता असल्याचे या संस्थेने म्हटले आहे.
जुलै महिन्यात दुचाकी वाहनांची विक्री मात्र 8.17 टक्‍क्‍यानी वा

ढून ती 1817077 इतकी झाली आहे. तर व्यावसाईक वाहनांच्या विक्रीतही 29.65 टक्‍क्‍यानी वाढ होऊन ती 76497 इतकी झाली असल्याचे सीआमने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)