भाजपच्या रथयात्रेला परवानगी देण्याचा निर्णय रद्द

कोलकाता: पश्‍चिम बंगालमध्ये भाजपाला “गणतंत्र बचाओ यात्रा’ काढण्याची परवानगी देणारा निर्णय कोलकाता उच्च न्यायालयाने अवघ्या एक दिवसात बदलला आहे. द्विसदस्यीय खंडपीठाने रथयात्रेला परवानगी देण्याचा निर्णय रद्द ठरविला आहे. या निर्णयामुळे भाजपाला मोठा हादरा बसला आहे.

भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली “गणतंत्र बचाओ रथयात्रा’ काढण्यास पश्‍चिम बंगाल सरकारने परवानगी नाकारली होती. या रथयात्रेला उद्यापासून (दि. 22) सुरुवात होणार होती. या पार्श्वभूमीवर भाजपाने कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर गुरुवारी एक सदस्यीय पीठाने निर्णय देताना भाजपाला रथयात्रेची परवानगी दिली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या निर्णयाला पश्‍चिम बंगाल सरकारने द्वीसदस्यीय खंडपीठासमोर आव्हान दिले. या खंडपीठाने शुक्रवारी एक सदस्यीय पीठाने दिलेला निर्णय रद्द केला. मुख्य न्यायाधीश देवाशिष करगुप्ता आणि न्या. एस. सरकार यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. या खंडपीठाने हे प्रकरण एक सदस्यीय पीठाकडे पाठवत राज्यातील गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या अहवालाची दखल घेण्यास सांगितले. या निर्णयामुळे भाजपाला हादरा बसला आहे.
भाजपच्या रथयात्रेमुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकते, असा अहवाल गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आला होता. त्यामुळे यात्रेला परवानगी नाकारल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)