अरुण गवळीच्या संचित रजेवर सोमवारी निर्णय?

नागपूर – मुंबईतील अंडरवर्ल्ड डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरुण गवळीने  संचित रजेकरिता (फर्लो) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. कारागृह प्रशासनाने यावर मंगळवारी उत्तर सादर केले. प्रकरणावर आता येत्या सोमवारी पुढील सुनावणी होणार असून त्यानंतर न्यायालय निर्णय जाहीर करू शकते.

गवळीने रजेकरिता सुरुवातीला कारागृह प्रशासनाकडे अर्ज दाखल केला होता. तो अर्ज फेटाळल्यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबईच्या दगडी चाळीवर एकेकाळी साम्राज्य करणारा हा गुन्हेगार शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांदेकर हत्येप्रकरणी नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. त्याला २० मे २००८ रोजी अटक करण्यात आली होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)