मोहिते पाटील यांच्या जामीन अर्जावर उद्या निर्णय

राजगुरूनगर (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या अटकपूर्व जामिन अर्जावर उद्या निर्णय होणार आहे. आज न्यायाधीशांनी दोन्ही बाजूने म्हणणे ऐकून घेत हा निर्णय दिला आहे.

चाकण हिंसाचार प्रकरणी खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए एम अंबळकर यांच्यापुढे आज सुनावणी झाली. यापूर्वी दि.१२ जुलै रोजी सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायाधीशांनी पोलिसांचे म्हणणे एकूण घेण्यासाठी आजची (दि.१८)तारीख दिली होती.

मोहिते यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज न्यायालयाने पोलिसांचे म्हणणे ऐकून घेतले. मोहिते पाटील यांचे वकील ऍड हर्षद निंबाळकर यांनी सक्षम बाजू मांडली तर सरकारी पक्षाच्यावतीने अरुण ढमाले यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूने म्हणणे ऐकून घेत न्यायाधीश ए एम अंबळकर यांनी उद्यापर्यंत निकाल राखून ठेवला आहे. या अटकपूर्व जामिनाच्या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान आजच्या सुनावणी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती. अनुचित प्रकार घडू नये यासाठी न्यायालयाच्या आवारात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)