अर्जुन रामपालची कन्याही करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू

बॉलिवूडमधील अनेक स्टार किड्‌स पदार्पण करायला लागले आहेत. त्यामध्ये सारा अली खान, जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांचा ठळक उल्लेख करायला पाहिजे. आता अर्जुन रामपालची कन्या मिहीका लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. तिच्याकडे कोणता सिनेमा आला आहे किंवा ती अन्य कोणत्या प्रोजेक्‍टवर काम करण्याच्या तयारीत आहे, हे मात्र समजू शकलेले नाही.

या संदर्भात अर्जुन रामपालने पुरेशी गोपनीयता बाळगली आहे. आपली कन्या नेहमीच बॉलिवूडमध्ये करिअर करू इच्छिते, असे अर्जुन रामपालने यापूर्वी अनेकवेळेस सांगितले होते. तिच्या करिअरसाठी अर्जुनने एखाद्या गॉडफादरला नक्की हाताशी धरले असणार. मात्र त्याचा खुलासा त्याने न केल्यामुळे सध्या याबाबत काहीच अपडेट नाहीत. अर्जुन रामपाल आणि मेहर जेसिया यांच्यातील 20 वर्षांपासूनचे वैवाहिक आयुष्य गेल्या वर्षीच समाप्त झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घटस्फोट झाल्यानंतर अर्जुन आणि त्याच्या कन्यांमधील बॉंडींग आणखीनच वाढले आहे. तो अजूनही आपल्या मुलींना नियमितपणे भेटत असतो. यापूर्वी त्याला “पलटण’मध्ये बघितले गेले होते. त्याच्या करिअरबरोबर त्याच्या मुलींच्या करिअरचा ग्राफही आता अधिक लक्षवेधी ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)