59 मिनिटांत कर्ज योजना महाराष्ट्र बॅंकेकडून सुरू 

पुणे – केंद्र सरकारने जाहीर केलेली छोट्या उद्योगासाठीची कर्ज योजना महाराष्ट्र बॅंकेत सुरू झाली आहे. लघु उद्योग आणि नव-उद्योजकांच्या सहाय्यार्थ प्रारंभ केलेली योजना सुरू झाल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री अहिर यांनी एका कार्यक्रमात सांगितले.

या योजनेमुळे व्यापार आणि उद्योगांना मोठी चालना आणि विश्वास प्राप्त होणार आहे. राज्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात बॅंक ऑफ महाराष्ट्राने लघु उद्योजकांना केलेय आर्थिक मदतीचा विशेष उल्लेख करून सांगितले की बॅंकेने या क्षेत्रात केलेले काम स्पृहणीय आहे. त्यानी पोर्टलच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या नोंदणी, सादरीकरण, अवधी आणि वैधता यासह शासनाने घेतलेल्या पुढाकाराबाबत सविस्तर माहिती दिली. नवउद्योजकांना बॅंकेच्या योजना, संबंधित योजना आणि आर्थिक सहाय्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या राष्ट्रीय कार्यक्रमास उत्तेजन देण्यासाठी बॅंक ऑफ महाराष्ट्रने पुढाकार घेतला असून कर्ज प्रकरणे मंजूर केली असल्याची माहिती दिली गेली. एमएसएमई यांच्या सहाय्यार्थ असलेल्या योजनांची माहिती इतर बॅंका तसेच डीजीएफटी, बीआयएस यांनी दिली. यामुळे देशात छोटे उद्योग वाढतील.

2 COMMENTS

Leave a Reply to Sangita pawar Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)