सपना चौधरीचा भाजपा प्रवेश वादात

नवी दिल्ली – गायिका आणि नृत्यांगना सपना चौधरीने नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. तिने ज्या कार्यक्रमाद्वारे भाजपमध्ये प्रवेश केला तो भव्यदिव्य स्वरूपाचा होता. यामुळे संघाचे पदाधिकारी आणि भाजपचे नेते नाराज झाले असल्याचे बोलले जाते.

हा कार्यक्रम सपना चौधरीच्या प्रवेशासाठीच ठेवण्यात आला होता की काय, असा आम्हाला प्रश्न पडायला लागला असल्याचे या नाराज पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. एका वेसबाईटने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की, पक्ष सदस्य मोहिमेच्या कार्यक्रमात अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र, कार्यक्रमाचे एकूण स्वरूप पाहता हा कार्यक्रम सपना चौधरीसाठीच ठेवण्यात आल्याचे वाटत होते.

पक्षप्रवेश झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सपना चौधरीची पत्रकार परिषदही ठेवण्यात आली होती. 7 जुलैला भाजपच्या सदस्य मोहिमेच्या कार्यक्रमात सपना चौधरीने भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि राष्ट्रीय सरचिटणीस रामलाल हे उपस्थित होते.

या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश करणारी सपना चौधरी एकटी नव्हती. आणखी 7 जणांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता. सपना चौधरीव्यतिरिक्त माजी सनदी अधिकारी, दिव्यांग तरुण, लष्करातील निवृत्त अधिकारी आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मंडळींचाही समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)