कॅलिफोर्निया आगीतील मृतांचा आकडा 63 वर, 600 पेक्षा अधिक लोक बेपत्ता

पॅराडाईस : कॅलिफोर्नियातील जंगलात लागलेल्या आगीत मागील आठवड्यापासून 63 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी आणखी सात जणाचे मृतदेह सापडले आहेत तर अजूनही 600 पेक्षा अधिक लोक बेपत्ता आहे. तसेच या क्षेत्रातील जवळ जवळ 12 हजार इमारती पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत.

आगीमुळे इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे की, शहराचे पुनर्वसन करण्यासाठी अनेक वर्ष लागतील, असे पॅराडाईस शहरातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. अमेरिकेत एखाद्या जंगल परिसराला इतक्‍या मोठ्या प्रमाणात आग लागल्याची ही पहिलीच घटना आहे.

या आगीने त्या परिसरातील मानवी वस्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अनेकांच्या गाड्या, घरे आणि अन्य मालमत्ता जळून खाक झाल्या आहेत. गेले चार दिवस ही आग धुमसत असून त्याचा फटका 27 हजार गावांना बसला आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

जंगलात वणवा भडकण्याची मोठी घटना 1933 मध्ये लॉस एंजल्सच्या ग्रिफिथ पार्क परिसरातील जंगलात घडली होती. त्यात एकूण 29 जणांचे बळी गेले होते. त्यानंतर आगीचे हे भयानक तांडव उत्तर कॅलिफोर्नियाने प्रथमच अनुभवले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)